वसंत पंचमी
शिशिर ऋतूत
येणार्या माघ शुद्ध पंचमीला वसंतपंचमी म्हणतात. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू
होतानाच्या काळात येणारा हा
सण आहे. भारतात
वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला
तरी खास करून
या दिवशी, नृत्यादि कला
शिकवणार्या संस्थांत, विद्येची देवता
- सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा
आहे. हा दिवस
सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी
ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली
जात असे. सूफी
परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत
निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून
हा सण साजरा
करतात.
माघ शुद्ध
पंचमी या दिवसाला वसंत
पंचमी असे म्हटले
जाते.कृषी संस्कृतीशी याचा
संबंध दिसून येतो.
या दिवशी नवान्न
इष्टी असा एक
छोटा यज्ञ करतात.शेतात तयार झालेल्या नवीन
पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या
देवाला
अर्पण करतात.हा
दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा
केला जातो. मथुरा,
वृंदावन, राजस्थान या भागात या
दिवशी विशेष उत्सव
साजरा केला जातो.
या दिवशी गणपती
, इंद्र, शिव आणि
सूर्य यांची प्रार्थनाही केली
जाते.बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत
प्रभातफेरी काढली जाते
पतंग उत्सव
भारतातीलच नव्हे
तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम
पंजाबात सुद्धा वसंतपंचमी ही
पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते.शेतातील सरसोची फुले पिवळी
जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा
दिवस साजरा केला
जातो.या दिवशी
केशर घातलेला गोड
भात खाण्याची पद्धती
आहे.
पुढील दिनविशेष - संत तुकाराम जयंती
०६/ ०२/ २०१७
पुढील दिनविशेष - संत तुकाराम जयंती
०६/ ०२/ २०१७